उल्हासनगर:राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करून दोन वर्षांचा अवधी उलटला असला तरी अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन सुरू आहे. उल्हासनगर येथील एका कारखान्यात महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी बुधवारी छापा टाकत कारखान्यातून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा २० टन साठा जप्त केला आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिकचे सर्रास उत्पादन सुरू आहे. उत्पादन करणाऱ्यांना कायदा आणि यंत्रणेचा धाक नसल्याचेही यातून समोर येत आहे.
प्लास्टिक कारखान्यावर कारवाई