दिल्लीतील प्राथमिक शाळा । ३१ मार्चपर्यंत बंद

नवी दिल्ली: करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. करोनाला रोखण्याठी विविध राज्यांतील सरकारे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. देशभरात आतापर्यंत करोनाच संसर्ग झालेले ३० रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्वच प्राथमिक शाळा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी घेतला आहे. या बरोबरच दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे.