| परिस - जगभरात फैलावलेल्या करोनाबाधेमुळे जगातील पोलिओ लसीकरण मोहीम मात्र | थंडावली आहे. ही मोहीम थंडावण्याचा गेल्या तीन दशकातील हा पहिलाच प्रकार आहे| जागतिक पोलिओ निमुर्लन संस्थेने म्हटले आहे की, करोनामुळे विविध देशांनी जे निबंध आपल्या देशांमध्ये लागू केले आहेत त्यामुळे आमचे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी | जनतेपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणची ही मोहीम थांबवण्यात आली | आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी व पोलिओ निर्मूलन मोहिमेचे प्रमुख मायकेल | जफरान यांनी म्हटले आहे की जगातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी आम्ही कसोशिने | प्रयत्न करीत असताना त्यात ही नवीन बाधा आली आहे. पोलिओ लसीकरण मोहीम थांबवण्याची वेळ आमच्यावर या आधी कधीच आली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले
करोनामुळे पोलिओ लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम