लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांसाठी नवी मुंबईत अन्नयज्ञ

भव्य गावी लाकडाऊनमुळे अडकून पडलेल्या हजारो नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी शहरात विविध ठिकाणी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सामाजिक संस्थांच्या वतीने अन्नयज्ञ सुरू करण्यात आला आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक दानशूर वव्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. लाकडाऊनमध्ये गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या २५० नागरिकांना वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था इस्कान ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे. या नागरिकांना दोन वेळचे जेवण आणि सकाळचा नाष्टा दिला जात आहे. महापालिका प्रशासन आणि जिल्हादीकरी कार्यालय यांनी या नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ शिसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या माध्यमातून दररोज ५०० जणांचे जेवण तयार केले जात आहे. हे जेवण अडकून पडलेले नागरिक, नाका कामगारपोलीस कर्मचारी आणि गरजूंना वाटप करण्यासाठी किशोर पाटील, संजय ठाकूर, राजेंद्र भगत, संतोष गर्जे यांच्यासह शेकडो शिवसैनिक दिवसरात्र परीश्रम घेत आहेत.पामबिच मार्गावरील मोराज रेसिडेन्सी येथे सतगुर शीतल फूड अण्ड हॉस्पीटलिटीच्या माध्यमातून अनुप पुरी आणि प्रकाश ठक्कर यांच्या वतीनेही गरजु नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.