'कोरोना' विरुद्धच्या लढाईत मुंब्यातील मुस्लिम समाजही मोठ्याप्रमाणावर उतरला आहे. मुंब्रा- कोसा या भागातील सुमारे ३५० मशिदींना टाळे ठोकण्यात आले असून नमाजसह सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याशिवाय ७० मदरसे देखील 'लांकडाऊन' करण्यात आले असून कोणीही गरजे शिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन मौलवींनी केले आहे. दरम्यान, संपूर्ण मुंब्यात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात केली असून बाजारपेठेमध्ये दिसणारा गजबजाट आता शांत झाला आहे. ___ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत असे आवाहन केले आहे. त्यास मुंब्यातील मुस्लिम बांधवांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला असून सर्व मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. मुंब्यातील अमृत नगर, कोसा, स्टेशन परिसर, शैलेश नगर, सोनाजी नगर, रशीद कंपाउंड, शिमला पार्क या भागात मोठ्या प्रमाणावर मशिदी आहेत. याशिवाय मदरसे तेदेखील खूप असून या सर्व धार्मिक स्थळांना कुलूपबंद करण्यात आले आहे. घरातच नमाज मशीदीमध्ये रोज पाच वेळा नमाज पडला जातो. सकाळी फजर की नमाज, दपारी एक वाजता जोहर की नमाज, संध्याकाळी पाचच्या सुमारास अशर की नमाज , सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास मगरिब की नमाजरात्री पावणे नऊ वाजता इशा की नमाज पढली जातेमात्र लाकडाऊनमुळे पाच वास्तव्य वेळची नमाज आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी घरातील मुस्लिम बांधव आपल्या घरांमध्ये नमाज अदा करीत आहेत. फक्त तीन-चार जणांचेच पूर्वी मुंड्यातील सर्व मशिदींमध्ये तसेच रस्त्यांवर प्रचंड गर्दी दिसून यायची. शुक्रवारच्या 'जुम्मे की नमाज' च्या वेळेस तर गर्दीच गर्दी दिसत होती. मात्र आता सर्व ३५० मशिदींच्या आवारात शुकशुकाट आहे. मशिदींमध्ये केवळ नमाज पडणारा इमाम, अजान देणारा मोजिम आणि साफसफाई करणारा खादिम । एवढे तीन - चार लोकच सध्या वास्तव्य करून आहेत. आठवड्यांपासून बंद झाली लॉकडाऊन असून इश्तमा तसेच विवाह सोहळे देखील रद्द करण्यात आले आहेत. संकट दर होण्यासाठी अल्लाकडे प्रार्थना ___मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेले आवाहन अतिशय महत्त्वाचे असून सर्व बांधवांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी लाकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यास मुंब्यातील मुस्लिम बांधव तसेच मौलवी यांनी पाठिंबा असल्याचे कमल मौलाना यांनी दैनिक 'सामना' शी बोलताना सांगितले. मुस्लिम बांधवांनी मशिदीत न जाता आपल्या घरातच नमाज अदा करून 'कोरोना' चे संकट दर व्हावे यासाठी अल्लाकडे प्रार्थना करावी असे आवाहन मौलवींनी केले आहे. आणि
नमाजसह सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द,